तू एक कोऱ्या पाटी सारखा, रोज तुझावर काहीतरी नवीन उमटावे.....
कधी a,b,c,d तर कधी क,ख,ग लिहावे......
कधी शब्द हरवावे, तर कधी ओळ सापडावी......
कधी सूर जुळावे, तर कधी गाणं लिहावे......
कधी बंद रेशमाचे, तर कधी नाते ऋणानुबंधाचे.......
कधी दव बिंदू गवता वरचे, तर कधी पाण्याचा थेंब अळूवावरचे......
तू तारा सप्तसुरांचा, तर कधी वारा मोडक्या किनार्यांचा....
तू शोधता वाट नवी, तुज सापडे रंग आभाळाचा......
तू एक कोऱ्या पाटी सारखा, सतत पुसण्याकरीता.......
पुन्हा काहीतरी नवीन लिह्ण्याकरिता........
Dedicated to : प्रशांत शिंदे
Dedicated to : प्रशांत शिंदे