तुझ्या मनातल्या चार शब्दांवर मी आज काव्य लिहले,
सर्व काही एकवटून त्यास कवितेत बांधले......
मनाचा प्रत्येक भाव मी निशब्द मांडले,
जणू अंतरी चा नाद मनातच वाजले......
तुझ्या स्वप्नांना पंख मी बांधले,
उंच उडी घेताना त्याला मी झेलले.....
माझा सूर गवसलाच नव्हता कधी मला,
जणू माझे सर्व शब्द या कवितेत सांडले.........