आयुष्य रांगत चालले, मनाच्या मीठीत
माझे स्वप्न नाही, आज माझ्या मुठीत.....
ओलावली वाळू सारी, किनार्यावरती
दुख विसरुनी, मन तरंगे लाटांवरती.....
आयुष्य रांगत चालले, दूर राहिला किनारा
मनाच्या कोपर्यात, बोचे हा खारा वारा.....
आज मन उदास आहे, जणू आठवली कुठली खुण
पाहता मागे वळून, आज घरावर साचले ऊन......
ओलावली वाळू सारी, किनार्यावरती
दुख विसरुनी, मन तरंगे लाटांवरती.....
आयुष्य रांगत चालले, दूर राहिला किनारा
मनाच्या कोपर्यात, बोचे हा खारा वारा.....
आज मन उदास आहे, जणू आठवली कुठली खुण
पाहता मागे वळून, आज घरावर साचले ऊन......
आता प्रवास हि संपला, स्वप्न पाहण्याचा
दूर राहिले घर माझे, मागे काळ्या पडद्याचा.......
आयुष्य रांगत चालले, आता असेच जगायचे
दूर हरवली वाट, आता लोकांच्या गर्दीत......
- ऋणानुबंध

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा