पुन्हा मी जाळत होतो त्या वीजलेल्या चीतांना,
पुन्हा मी विजवत होतो पेटलेल्या विस्तवांना.........
जगणे मरणे झाले सोपे,
कारण यांचामध्येच जळत होतो जगताना......
कोणी हसले तर कोणी रडले मरणशय्येवर,
मला नव्हती खंत कारण मीच सजवत होतो त्यांना लाकडांवर......
जणु रोजचीच सवय झाली होती मला,
कि दैवाने जगणेच लिहले होते तसे मला........
मी कधी विचार नाही केला याचा,
कारण मला नव्हती कोणाची वाचा........
ऐके दिवशी विचारी मला का असा निष्टुर तू,
मग मी हि म्हटले जसा मी तसाच तू.....
त्याला नाही कळले त्याचा प्रश्नाचे उत्तर,
आणी मी सजवली चिता मरणशय्येवर......
पाहता त्या चिते कडे आला प्रश्न माझ्या मनी,
जाळेल जो मला असा आहे का कोणी धनी.......
पाहता मागे होते एकच उत्तर,
जसे मरणे सोपे तसेच जगणे हि बत्तर......
आज हि असह्यांची आहेत इकडे लक्तर........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा