रविवार, २० मे, २०१२

आयुष्य रांगत चालले......




आयुष्य रांगत चालले, मनाच्या मीठीत
माझे स्वप्न नाही, आज माझ्या मुठीत.....

ओलावली वाळू सारी, किनार्यावरती
दुख विसरुनी, मन तरंगे लाटांवरती.....

आयुष्य रांगत चालले, दूर राहिला किनारा
मनाच्या कोपर्यात, बोचे हा खारा वारा.....

आज मन उदास आहे, जणू आठवली कुठली खुण
पाहता मागे वळून, आज घरावर साचले ऊन......

आता प्रवास हि संपला, स्वप्न पाहण्याचा
दूर राहिले घर माझे, मागे काळ्या पडद्याचा....... 

आयुष्य रांगत चालले, आता असेच जगायचे
दूर हरवली वाट, आता लोकांच्या गर्दीत......

- ऋणानुबंध 

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

तू भेटशील का पुन्हा नव्याने.....


मी आज हि वाट पाहत आहे,
तू होतास जसा माझा,
तसाच होशील का पुन्हा रे.......

तुझाशी स्वच्छंद गप्पा मारणारी मी,
आज तुझाशी बोलायला घाबरत आहे,
तू देशील का मुक्तता बोलायची याचीच वाट पाहत आहे......

तू अंतर दिलंयस मला,
असा नाही म्हणार मी,
तरी तगमग अंतरीची नाही सांगणार मी.......

माझ्या मनात तुझ्यासाठी,
असंख्य अशी जागा आहे,
तरी तू त्या जागेत मावशील का याचीच भीती वाटत आहे........

मला ठाऊक आहे,
तू माझाच आहेस,
तरी हि खूप दूर वाटत आहेस......

तुझ्या सुंदर आयुष्याची स्वप्ने मी पाहत आहे,
तू असाच राहशील हेही मला माहित आहे,
तरी आज मन का विचलित आहे......

बहुतेक तू दूर जाऊ नयेस,
याचीच मनी भीती आहे,
तू भेटशील का नव्याने....... याचीच आज हि मी वाट पाहत आहे. 

Dedicated to: मीनल घनवटकर 

तू माझा.....

कधी तू वाटे लुप्त ताऱ्यांचा,
कधी चंद्र साक्षीचा......

कधी तू अवघड प्रश्न,
तर कधी उत्तर सोप्या कोडींचा......

कधी ह्याचा तर कधी त्याचा,
कधी हिचा तर कधी तिचा......

कधी स्वप्न तर कधी सत्य,
कधी स्वतःचा दुनियेत मग्न......

तुला ओळखणे भलतेच अवघड आहे,
पण तरी तू माझ्याच जवळ आहे......

तू असून हि सर्व जगाचा,
आहेस आयुष्यभर फक्त........
तू माझा.

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

मनाचा अंतर्नाद

तुझ्या आणी माझ्या मध्ये कसले हे अंतर आहे,
तुझ्या आणी माझ्या मध्ये सगळं आधी आणी नंतर आहे......

तूच माझी प्रेरणा तूच माझी अर्चना,
तूच माझा ध्यास तूच माझा श्वास.....

तू भाव अंतरीचा कि सूर सप्तसुरांचा,
तू मंद लवती पात जशी जळे दिन रात.....

तू तारका नभातला जशी रात पौर्णिमेची,
तुझा स्पर्श असा कि ओली रेती भिजलेली.....

हळुवार मनाच्या अबोल कोडी,
तुटता तुटे ना अशी आपली जोडी.....

एकमेकांसाठी जगणे मरणे असा एकच ध्यास,
तरीही कधी वाटे पडला हातातला घास....

गुंतले जीव हे तुझ्यात माझे आणी माझे तुझ्यात,
विरहाचा हा खेळ चाले सतत आपल्यात.....

ह्याच विरहात धरतो पुन्हा आशेचा हाथ,
हळूच कानात बोलून जाई तुझ्या आवाजाची हाक.....

आवाज ऐकून तुझा येतो अंगात जोम नवा,
भरतो मुठीत पुन्हा एकदा एकवटून निसर्गाची हवा.....

बंद करू पाहतो सर्व रंग माझ्या मुठीत,
भरलेली ओंझळ निसटून जाईल म्हणून मीही भितो गुपीत.....

तुझ्या आणी माझ्या मध्ये कसले हे अंतर आहे,
तुझ्या आणी माझ्या मध्ये सगळं आधी आणी नंतर आहे......


शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

ज्वलंत जिवन

पुन्हा मी जाळत होतो त्या वीजलेल्या चीतांना,
पुन्हा मी विजवत होतो पेटलेल्या विस्तवांना.........   

जगणे मरणे झाले सोपे,
कारण यांचामध्येच जळत होतो जगताना......

कोणी हसले तर कोणी रडले मरणशय्येवर,
मला नव्हती खंत कारण मीच सजवत होतो त्यांना लाकडांवर......

जणु रोजचीच सवय झाली होती मला,
कि दैवाने जगणेच लिहले होते तसे मला........

मी कधी विचार नाही केला याचा,
कारण मला नव्हती कोणाची वाचा........

ऐके दिवशी विचारी मला का असा निष्टुर तू,
मग मी हि म्हटले जसा मी तसाच तू.....

त्याला नाही कळले त्याचा प्रश्नाचे उत्तर,
आणी मी सजवली चिता मरणशय्येवर......

पाहता त्या चिते कडे आला प्रश्न माझ्या मनी,
जाळेल जो मला असा आहे का कोणी धनी.......

पाहता मागे होते एकच उत्तर,
जसे मरणे सोपे तसेच जगणे हि बत्तर......

आज हि असह्यांची आहेत इकडे लक्तर........

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

नेहमीच वाटत.....

नेहमीच वाटतं कोणीतरी आपलस व्हावं 
सुख दु:ख् वाटुन घेणार कोणीतरी असावं 

नेहमीच वाटतं माझ्यावरही प्रेम करणार कोणी असावं  
ह्रदयात सामावून घेणारं कोणीतरी आपल असावं  

नेहमीच वाटतं बागेत भेटणार कोणीतरी असावं  
प्रेमाने गुलाबाच फुल देणार कोणीतरी असावं 

नेहमीच वाटतं हातात हात घेणार कोणीतरी असावं  
लढ्ण्याची प्रेरणा देणार कोणीतरी असावं  

नेहमीच वाटतं माझीही आठवण काढ्णार कोणीतरी असावं  
आठवणीत माझ्या प्रेमपञ पाठवणार कोणीतरी असावं  

नेहमीच वाटतं सुखात माझ्या सुख मानणार कोणीतरी असावं  
मी रडत असतांना डोळे पुसणार कोणीतरी असावं  

नेहमीच वाटतं प्रेमान हाक मारणार कोणीतरी असाव्
माझ्यासाठीही गाणं म्हणणार कोणीतरी असावं  

नेहमीच वाटतं संकटात धीर देणार कोणीतरी असावं  
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असावं  

नेहमीच वाटतं आपल्यासाठीही कोणीतरी जगावं 
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असावं  

नेहमीच वाटतं माझ्यावरही प्रेम करणार कोणी असावं  
मलाही आय लव्ह यु म्हणणार कोणीतरी असावं 

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

आज पुन्हा डोळे पाणावले..... तिच्या आठवणीत.


मला ती रोज भेटते नेहमी सारखीच,
रोज कट्ट्यावर बसून गप्पा होतात,
तर कधी कटिंग भर पावसात.......

बघता बघता वर्ष संपली,
जणू माझ्या भेटण्याची कारणं संपली,
आज शेवटचा दिवस करत पाहण्याची वेळ हि संपली.......

दोन दिशेच्या दोन वाटा आम्ही स्वीकारल्या,
नवीन आयुष्यात नवीन भेटी उलघडल्या,
नवीन लोकांमध्ये जणू जुने हसू सापडले........

वर्ष सरत गेली आणी जगायची ओढ संपू लागली,
आज संध्याकाळी खिडकीत पुन्हा तोच सूर्य मावळताना दिसला,
जणु जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.......

आयुष्यभर एकटा जगत आलोय,
आज पुन्हा मागे पहावासा वाटतंय,
मागे बघताना त्या जुन्या आठवणी जगाव्याशा वाटतात .......

सगळे क्षण जगताना,
पुन्हा एकदा त्या वळणावर आलो,
सोडून गेलीस मला त्या क्षणी हरवलो.......

पुन्हा आज भेटावसं वाटतेय,
पुन्हा एकदा भर पावसात कटिंग पियावीशी वाटतेय,
आज डोळे पाणावले.......तुझ्याच स्मृतीत,

पुन्हा तुझ्या आठवणीत,
डोळे भरून भर पावसात भिजावंसं वाटतेय..........

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

निशब्द भाव

तुझ्या मनातल्या चार शब्दांवर मी आज काव्य लिहले,
सर्व काही एकवटून त्यास कवितेत बांधले......

मनाचा प्रत्येक भाव मी निशब्द मांडले,
जणू अंतरी चा नाद मनातच वाजले......

तुझ्या स्वप्नांना पंख मी बांधले,
उंच उडी घेताना त्याला मी झेलले.....

माझा सूर गवसलाच नव्हता कधी मला,
जणू माझे सर्व शब्द या कवितेत सांडले......... 

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

खरच मला माहित नाही.....

तू अशी आहेस कि तशी,
खरच मला माहित नाही.....

तू रोज मला भेटतेस, 
बरच काही बोलतेस,
पण नक्की काय,
खरच माहित नाही......

कधी मनातलं सांगतेस,
कधी माझ्या मनातलं ओळखतेस,
माझ्यासाठी किती धडपडतेस,
खरच माहित नाही.......

मी हि निष्कळ प्रयत्न करतो,
तुझासाठी काहीतरी करायचं,
किती करतो,
खरच मला माहित नाही.....

तू अशीच राहशील माझ्या सोबत,
म्हणूनच मी हि करतो मेहनत,
पण राहशील का ??
खरच माहित नाही......

विश्वास आहे अतूट माझा तुझावर,
तुझं विश्वच सभोवते माझ्यावर,
मला हि जमेल का कधी,
खरच मला माहित नाही......

मी हि एक वचन देतो,
देईन साथ आयुष्यभर तुझी,
आहे मी तुझा ऋणी,
खरच एवडंच सत्य आहे.......या जगी.

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

राधा माझ्या मनाची......

तुजवीण मी आहे अधुरा,
सोडू नकोस साथ माझी..... मी आहे अपुरा......
तूच माझ्या आयुष्याचा दिवा,
तूच माझी शिक्षा.... तूच माझा धडा......

कधी खट्याळ तर कधी शांत,
कधी मनास वाटे खंत......
तू आज हि तशीच हवी मला,
जशी होतीस माझ्या मना.......

तुज शोधता मज सापडे,
एक मिणमिणता दिवा......
ज्याचे तेज माझासाठी,
साचवे दुखांचा थवा......

नाही मी दुखी तीचापासून, 
जी वाटे मीरा सारखी......
पण आजही ती आहे,
राधा माझ्या मनाची......

Dedicated to : मीनल घनवटकर.

शनिवार, २८ जानेवारी, २०१२

तूच जगण्याचा खरा अर्थ

तुझ्यासाठी मी आज हि तोच आहे,
कधी वारा तर कधी गंध आहे.....

अजून हि मी कालचाच दीप आहे,
जो फक्त तुझ्यासाठी जळत आहे..... 

तू गेलीस सोडून जरी,
तरी नाही दुःख  मज आहे....

न बोलीन काही कधी,
जरी आलीस परतुनी कधी......

काल हि तूच होतीस जगण्याचा मार्ग,
आणी आज हि तू माझा स्वर्ग.....

जीवन तुझ्याविणा व्यर्थ आहे,
तूच जगण्याचा खरा अर्थ आहे.....

Dedicated to : मीनल घनवटकर.

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

असाव कुणीतरी...................

असाव कुणीतरी.......
आपल्या हाकेला 'ओ' देणार,
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावणार .........

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार,
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार ......

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार खोटा रुसवा आणून,
पुन्हा आपल्यावरच रागवणार ......

असाव कुणीतरी
मनमोकळ बोलणार काहीही न सांगता,
अगदी मनातल ओळखणार .......

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार,
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार .......


खरच असाव कुणीतरी...................

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

तू एक कोऱ्या पाटी सारखा

तू एक कोऱ्या पाटी सारखा, रोज तुझावर काहीतरी नवीन उमटावे.....
कधी a,b,c,d तर कधी क,ख,ग लिहावे......    

कधी शब्द हरवावे, तर कधी ओळ सापडावी......
कधी सूर जुळावे, तर कधी गाणं लिहावे......

कधी बंद रेशमाचे, तर कधी नाते ऋणानुबंधाचे....... 
कधी दव बिंदू गवता वरचे, तर कधी पाण्याचा थेंब अळूवावरचे......

तू तारा सप्तसुरांचा, तर कधी वारा मोडक्या किनार्यांचा....
तू शोधता वाट नवी, तुज सापडे रंग आभाळाचा......

तू एक कोऱ्या पाटी सारखा, सतत पुसण्याकरीता....... 
पुन्हा काहीतरी नवीन लिह्ण्याकरिता........

Dedicated to : प्रशांत शिंदे

मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

फुलांशी हितगुज ......

नदीच्या काठी उभी मी एकटी वाट अजूनही पाहते,
कधीतरी येशील परत हेच आजही मन सांगते......

माहिती आहे मला नाही तू माझ्या आयुष्यात,
तरीही मी तुझीच आहे पाहीन आयुष्य भर वाट.....

रोज हेच होत आहे तरी नाही दिसत तू मला,
आणी मग रुसून बसली की फुले विचारती मला....

प्रत्येक वेळी विचारत रोज एकच प्रश्न,
कोण आहे असा तो ज्याचत तू मग्न.....

मग मी हि उत्तर देते त्यांना....

तो आहे असा की ज्याची नाही तुलना,
पण मनात त्याचा नाही माझी गणना.....

तरी ही मी घाबरत नाही दुःखाच्या वादळाला
अजून ही मी स्थिर आहे सांगते त्या पाषाणाला....

दूर गेलास निघुनी तरी आहेस जवळ माझ्या,
असे कसे लोटू त्याला दुःखाच्या सगरात माझ्या.....

असे काय घडले गुन्हे जे नाही तुम्ही एकत्र,
प्रश्न विचारी फुले सतत हेच रोज मात्र.....

आज सांगते म्हणाली त्यांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर,
ऐका नीट डोळे कान उघडे ठेवून.....

घाव माझे हे फुलांनो विचारू नका,
आणी सांगीतले
जरी तुम्हास तर शाहरू नका.....

उत्तर देताच फुले आश्चर्याने म्हणाली,
आज कळतेय की तू का एकटी उभी किनारी....

मन आजही न्हातेय त्याचा आठवणीत,
आणी मग पाहतो नेत्रात तुझ्या साठवलेले अश्रू.....
त्याच्या  आठवणीत........

अंतरी माझ्या

काहीतरी सांगून गेलीस तू .... 


पण मनास उमगत नाही काही,
कसे आवरू स्वतःला आज ही भरकटत आहे.....


तुझ्या विना जगणे अशक्य आहे.... 

कसे सांगू तुला कहीच कळत नाही.

तूच माझा जगण्याचा आधार ....

तूच माझी जीवनाची ढाल.

परी अंतरी माझ्या..... 
तुझ्याच सुरांची चाल.


आहेस अशी कोण माझी..... 
नाही सांगू शकत शब्दात....


बघ एकदा वाकून मनात,
येईल तुला माझ्या शब्दांची हाक.........

माझा शोध

माझ्या एका श्वासात जग सारे तुझे भरुनी...
माझ्या एका हुंदक्यात जग सारे गेल तुला सोडूनी....

कधी होतीस तू माझी असे हे मनाचे अवचट कटू बोल .....
काय करू कसे समजावू कळे न मला आज......
मन इतके अस्थिर कि हरवू लागली वाट......

दिवस रात्रीच्या खेळात वर्ष गेले सरुनी....
अजून ही मी शोधात आहे तुला जवळ ठेवुनी....

तुझ्या स्मृतीत....

मन माझे झुरत आहे तुझ्या स्मृतीत....
हो नाही ची अवचट कोडी आज हि मुठीत.....

तू हो म्हण नाहीतर नाही.....
तू होतीस तशीच राहा असे ही म्हणत नाही.....

तरी तू हवी आहेस माझ्या आयुष्यात.....
जा असा ही म्हणणार नाही .......

पहिल्यांदा आज दुरी तुझी भासत आहे.....
मन आज पहिल्यांदा नसल्याचा भासत आहे......

का कळेना.....

कधीतरी असावे कोणी आपल्यासाठी, 
पलीकडल्या बाजूला
दूर नदीच्या काठावर, 

रागावून बसलेला........

कसे कळेना त्यास....

हे झाले असे का आयुष्य
मनातल्या कोडी मनात अडकलेल्या.......

सोडवता नाही जमले हे गुंते, 

म्हणून नदी काठी बसलेला
आज हि तो त्या गुंत्यात अडकलेल्या.......

अस मी तिला कितीदा पाहिलेलं........

ती एका कोनाडयात बसलेली, 
स्वतः मध्ये हरवलेली
अस मी तिला कितीदा पाहिलेलं........


सारे काही पाहत असताना देखील, 
मन माझे झुरत होते,
पण विचारायचे काय, 

हे कोडे अजून बाकी होते,

शब्दकोशात माझ्या मला उल्घडला सूर नवा,
जणू काही पौर्णिमेचा चंद्रमा.......
गर्द निळ्या आकाशात, 

झुले पक्ष्यांचा थवा,
आणी सागराला मिळे प्रेमाची ऊबदार हवा......


तरीही प्रश्न तोच होता....

काय आहे असे तिच्या मनात,
जे बोलताच क्षणी.....

उडून जाईल रंग हवा......

मग मी हि निश्चय केला, 

भरला अंगात जोम नवा,
आणी धाडस करुनी विचारला प्रश्न होता जो माझ्या मना......


अगं सांग तरी का अशी कोनाडयात तू बसलेली कोणावर रुसलेली,
मंजुळ स्वरात न तिच्या ओघळल्या अश्रूंच्या झरा.....

घेत हुंदके थांबवून रडू,

सांगितली तिने तिची व्यथा....
ऐकून झालो गारद, 

जणू शब्दांनेच गिळले मला........
मोहत्ना मग प्रेमात बुडाला, 

हा विश्वाचा करुणाकरा....

अखेर ठरला डाव विजयाचा...... 

आणी मातला कंस व्यथेचा,
नियती ची अवघड कोडी सांगून गेली ....... कोण राहिला इथे भला........